नवीन लेखन...
Avatar
About डॉ.संतोष सेलूकर
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

जगण्याचं बळ..

“ऐका हो ऐका उद्या शाळंतल्या लेकराव्हायचे आधार कार्ड वाले येणार हायेत तरी उद्या ज्यैच्या लेकरायचे आधार काल्ड काढायचेत तैनं धा वाजता शाळंत हाजर रवावं हो” […]

देहात भरून घ्यावा सूर्य…

सोनेरी उन्हाची शाल अंगावर लपेटून घेतांना आख्या देहात भरून घ्यावा सूर्य अन् उगवावे आपणही निरुत्साहाच्या विशालकाय डोंगरापाठीमागून रोज अन् उजळून टाकावे स्वत:सहित सा-या जगाला. […]

सांगळीवरचा प्रवास

सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. […]

‘कवितेचे झाड’

शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या […]

न संपणारा रस्ता (कथा)

नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी  पेलं. […]

नदीबाई माय माझी..

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. […]

एका डोळ्यात आसू तर….

ही गोष्ट आज सांगतांना मात्र अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की एवढया दुर्गम भागात आपण सुरूवातीचे दिवस काढले पुढे मग शाळेवर गेल्यावर याचे काहीच वाटले नाही. अतिशय आनंदाने शाळेत जात असे मी उलट घरी आल्यावरच करमत नसे अशी माझी पहिली नोकरीतील शाळा. आज ही माझ्या तेवढीच चांगल्या रितीने स्मरणात राहिली आहे. […]

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही. […]

गावधुळीत माखलेले रम्य दिवस..

गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत. […]

अंबाड्याची दोरी ना दोरखंड..!

आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..