माणसांसारखी मळताना दिसत नाहीत झाडं..!
झाड म्हणजे… पाखरांची वसाहत! झाडं म्हणजे हिरवळ! जीवन प्रसन्न करणारा निसर्गातील एक अविभाज्य घटक…! रेल्वेत बसल्यावर झाडं पळताना दिसतात… मुलांसोबत खेळताना दिसतात… माणसांसोबत जळतांना दिसतात जसे वळविले तसे वळतानाही दिसतात…झाडं! पानांसोबत गळतांना दिसतात कधी झाडं.. सर्वांसोबत रुळताना दिसतात झाडं पण माणसांसारखी मळतांना दिसत नाही कधीच झाडं …पण माणसांसारखी मळतांना दिसत नाहीत कधी झाडं…..!! […]