वसंत रांजणे
वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. […]