नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे अतुल बेडेकर

व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते. […]

गायिका सुषमा श्रेष्ठ

आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ व ‘क्या हुआ तेरा वादा’ खूपच गाजली होती. […]

इन्फंट्री डे

२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती. […]

मराठी संशोधक व लेखक  अनंत काकबा प्रियोळकर

अनंत प्रियोळकर यांचे शिक्षण गोवा, धारवाड आणि सांगली येथे झाले.सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात शिकत असताना विख्यात भाषाशास्त्रज्ञ डॉ. पां. दा. गुणे ह्यांच्याशी प्रियोळकरांचा निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासामुळे भाषाशास्त्र आणि पाठचिकित्साशास्त्र ह्या विषयांकडे प्रियोळकर ओढले गेले. […]

‘विस्डेन’या जगप्रसिद्ध क्रिकेट मासिकाचे संपादक – जॉन विस्डेन

विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनार्या१नजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बर्यानपैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. […]

क्रीडा समीक्षक सुनंदन लेले

आपल्या सर्वांना सुनंदन लेले हे एक क्रीडा समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत क्रिकेट खेळाकरिता आपल्या
लिखाणातून खूप मोठे योगदान दिले आहे. […]

ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका मालिनी राजुरकर

मालिनीताई राजुरकर या माहेरच्या प्रभा वैद्य. त्यांचे घराणे मूळचे इंदूरचे असले तरी त्यांच्या वडिलांचे नोकरीनिमित्त वास्तव्य अजमेर येथे होते. त्यामुळे मालिनीताईंचे सर्व शिक्षण अजमेर येथेच पार पडले. त्यावेळी अजमेर येथे शाळेमध्ये संगीत शिक्षण सक्तीचे होते. त्यामुळे शाळेतील संगीताचा तासाला जे संगीत कानावर पडे तेव्हढाच त्यांचा गाण्याचा संबंध येत असे. […]

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. […]

भाषा संशोधक तथा राष्ट्रकवी गोविंद पै

गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्‌मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता. […]

1 16 17 18 19 20 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..