संगीतकार मदन मोहन
मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जून १९२४ रोजी बगदाद, इराक येथे झाला.मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा इराकमधला जन्म. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. […]