थकवा
सर्वसामान्य जनतेत “थकवा‘ ही तक्रार वारंवार आढळते. डॉक्टारां‘कडे येणाऱ्या रुग्णांपैकी दहा टक्के लोकांची “”थकवा जाणवतो आहे‘‘ ही तक्रार असते. सर्व रुग्णांत एकवीस टक्के थकवा जाणवतो. थोड्या काळापुरता आणि नव्याने जाणवला जाणारा थकवा ही अनेक रुग्णांची तक्रार असते. दीर्घकाळ रेंगाळणारा थकवा हा विकार त्यामानाने क्वचितच आढळणारा आजार असतो. पौगंडावस्थेत जाणवणारा थकवा हा बऱ्याच वेळा खिन्नतेचे (डिप्रेशनचे) लक्षण […]