नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला. […]

भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय

राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्याथ स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत. ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता. त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणाऱ्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली. […]

सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा

‘गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली. […]

वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियापासून केली आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते मुंबई आवृत्तीचे सिटी संपादक होते. सहा वर्षे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केल्यावर राजदीप सरदेसाई यांनी १९९४ मध्ये न्यू दिल्ली टेलिविझन (एनडीटीव्ही) मध्ये संपादक म्हणून नोकरीला सुरुवात करून टेलिव्हीजन पत्रकारिता मध्ये त्यांनी पदार्पण केले. आपली स्वत: ची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूज (जीबीएन) तयार करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही सोडली. […]

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. […]

आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित

सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले. […]

‘अमर अकबर ॲ‍न्थनी’ चित्रपटाची ४५ वर्षे

मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात, आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली. या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले. […]

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचा वर्धापन दिन

२७ मे १९५१ रोजी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती नेमली. दुसऱ्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना […]

‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं

या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता. […]

भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री नितीन गडकरी

१९७६ मध्ये नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले.२० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. […]

1 48 49 50 51 52 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..