सोलापूर विद्यापीठाचा वर्धापन दिन
“विद्यया संपन्नता” हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सोलापूर विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना २२ जुलै २००४ रोजी झाली, व प्रत्यक्ष कामकाज ०१ ऑगस्ट २००४ पासून सुरू झाले. दुष्काळी व ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करुन, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे. […]