नवीन लेखन...
Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

भारतमातेच्या वीरांगना – ४८ – गुलाब कौर

स्वातंत्र्य संग्रामातील विषय, कामाचा आढावा सामान्य जनतेपर्यंत पोचवायची एकच पद्धत त्याकाळात उपलब्ध होती, ती म्हणजे पत्रक, वृत्तपत्र इत्यादी. गुलाब कौर ह्यांनी पत्रकारकेची भूमिका घेतली आणि त्यायोगे, घरा-घरातुन स्वातंत्र्य संग्रामशी जोडलेले साहित्य पोहचवू लागल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जन जागृती करणे हे त्यांचे मुख्य कामच झाले जणू. एक पत्रकार म्हंटल की थोडी सहूलत पण मिळत असेल बहुदा म्हणून मग त्यांनी आपल्या शबनम बॅग मधून क्रांतीकारकांसाठी दारुगोळा, पिस्तुलं अशी ने आण सुरू केली. एकूणच त्याचा समजात वावर बघता इंग्रजांना त्यांच्यावर शंका येऊ लागली. ते पण एखादा सुगावा / पुरावा मिळतो का ह्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. दैवदुर्विलास एकदा अश्याच गुलाब कौर क्रांतिकारी साहित्याच्या वाटप करायच्या उद्देशाने बाहेर पडल्या, ह्यावेळी त्यांना पिस्तुलं आणि काडतुस पोहचवायची होती, पण त्या सगळ्या मुद्देमाला सह पडकल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद चा नारा परत एकदा पूर्ण आसमंतात घुमला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४७ – डॉ. इंदुमती नाईक

१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४६ – यशोधरा दसप्पा

१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू ‘हॅमिल्टन’ हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४५ -अन्नपूर्णा महाराणा

१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४४ – अम्मू स्वामीनाथन

गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर फार दिसून आला. कमलादेवी चटोपाध्याय, ऍनी बेसेंट, ह्या सगळ्यांबरोबर त्या मद्रास मध्ये विविध उपक्रम राबवित होत्या. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने Women’s India Association, मद्रास येथे आकारास आली ज्या अंतर्गत भारतीय महिलांच्या समस्यांवर खूप मोठे काम सुरू झाले, जसे की बाल विवाह रोकणे, स्त्री शिक्षण, देवदासी प्रथा, परदा प्रथा मोडून काढणे इत्यादी. स्वातंत्रता संग्रामात सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. भारत छोडो आंदोलना नंतर त्यांनी १ वर्ष सश्रम कारावास देखील भोगला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४३ – राजकुमारी अमृत कौर

पंजाब मधील जलीयनवाला बाग हत्या कांडाने त्यांचे मन उद्विग्न झाले, भारतावरील ब्रिटिश राजवटीचे काळे रंग सगळ्या देशाने अनुभवले. राजकुमारी अमृत कौर आतून हलल्या. त्यांच्यावर गांधी विचारधारेचा पगडा होताच. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. गावा-गावातून फिरून लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दल जागरूकता निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती म्हणजे कितीतरी लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय ह्याचेसुद्धा आकलन नव्हते. त्याचबरोबरीने समाजात बरीच सुधारणा आवश्यक आहे जे त्यांना जाणवलं. बाल विवाह बंदी, परदा प्रथा किव्हा देवदासी ह्या सगळ्यांविषयी त्या बोलल्या. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. दांडी यात्रा, चले जाव आंदोलन ह्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येकवेळी त्यांना कारावास सश्रम भोगावा लागला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४२ – पार्वती गिरी

त्यांनी शाळेला राम राम ठोकला आणि काँग्रेस कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्या खेड्या-पड्यातून प्रवास करायच्या, लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या भावना जागृत करायच्या. देशाच्या कान्या-कोपऱ्यात कसे हे समर पेट घेते आहे हे सगळ्यांना जीव तोडून सांगत होत्या. स्वदेशी म्हणजेच खादीचा वापर, प्रचार आणि प्रसार केला. गावागावातून चरखा चालविण्याचे, सूत कातण्याचे प्रशिक्षण दिले. आपण गुलामगिरीत जगतोय ह्याची जाणीव जनमानसाला करून द्याययचे काम पार्वती गिरी ह्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सुरू केलं. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४० – अंजलाई अम्मल

१९२१ साली असहकार आंदोलना पासून त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील प्रवास सुरु झाला. दक्षिण भारतातल्या त्या पहिल्या महिला सेनानी ठरल्या. फक्त स्वतः भाग घेऊनच नव्हे तर आपली पारिवारिक भूमी, घर असं सगळं त्यांनी विकून टाकले आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी राशी दिली. हे करतांना आपल्या भविष्याच काय? हा प्रश्न या माऊलीला पडला नाही. जे माझे ते देशासाठी अर्पण असाच त्याचा विचार होता. १९२७ साली नीलन ची मूर्ती हटविण्या विरुद्ध त्यांनी लढ्यात सहभाग घेतला, त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या नऊ वर्षांची मुलगी अम्माकानु ला कारावास भोगावा लागला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ३९ – चंद्रप्रभा शईकियानी

असहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप ‘आसाम प्रादेशिक महिला समिती’ १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले. […]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..