भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव
१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली. […]