भारतमातेच्या वीरांगना – 6 : मूलमती
रामप्रसाद ह्यांचे पहिले पिस्तुल घ्यायला पैसा मूलमतींना पुरवला. ते हाती देतांना मात्र एक वचन घ्यायचे त्या विसरल्या नाहीत, की अगदी कुठल्याही प्रसंगी, आपल्या शत्रूवर सुद्धा ह्या शस्त्राचा गैरवापर करणार नाही. […]
रामप्रसाद ह्यांचे पहिले पिस्तुल घ्यायला पैसा मूलमतींना पुरवला. ते हाती देतांना मात्र एक वचन घ्यायचे त्या विसरल्या नाहीत, की अगदी कुठल्याही प्रसंगी, आपल्या शत्रूवर सुद्धा ह्या शस्त्राचा गैरवापर करणार नाही. […]
आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता. […]
१९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला. […]
आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]
इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. […]
१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली. […]
परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले […]
आज खूप दिवसांनी बेसनाची वडी केली, अगदी सहजच आणि अनाहूतपणे पाय देवघरा कडे वळले, देवाला नैवेद्य दाखवायला. खूपच छोटीशी कृती पण इतकं समाधान देऊन गेली आणि पार भूतकाळात घेऊन गेली. […]
सहज मनात आलं, लहान मुलं ज्यावेळी अशी नाटकीयता आपल्या आवाजात आणून, चेहरा बदलून काही बाही बोलतात, त्यावेळी घरातले सगळे टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतात आणि त्याला प्रोत्साहित करतात, हे तर मुळ नाही ना त्याचे? […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions