नवीन लेखन...

प्रेरणा

“प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.” […]

सूर बदला, जग बदलेल

बोलक्या गाण्यांचा जसा एक “सुर” असतो तसा आपल्या सर्वांच्या बोलण्याचा पण “सुर” ( tone ) असतो उदा: तिरसट, टोचुन बोलण्याचा, राग, प्रेम, तिरस्कारपुर्ण, अलिप्ततापुर्ण, उपहासात्मक, आदरपुर्वक वगैरे. आपल्या बोलण्यामध्ये असल्या भावनांचा परिणाम लगेच संवादामध्ये होऊ न देतां सुर जर सामान्य अर्थात मृदु ठेवला तरी बरेंच काही साध्य होऊ शकते. सुदैवाने गोड बोलायला काही मेहनत पडत नाही व पैसेही पडत नाही, फक्त तशी खुणगांठ मात्र मनांत सतत लक्षांत ठेवावी लागते. […]

आपातीत गरजांची पुर्ती

आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा  इतिहास थोडक्यात बघु या, कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘आज मिळाले ते आपले’ व ‘उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे, नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व  दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणीसाठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य  चलन (पैसे) आले व व्यापाराला सुरवात झाली. […]

एखादी स्मित रेषा

तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या  चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्‍यावर  प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. […]

न्हाऊ घाल, माझ्या मना

न्हाऊ घालणे म्हणजे स्नान घालणे, आंघोळ घालणे, उद्देश : स्वच्छ करणे. देवाला ( धना म्हणजे देव ) आर्त हांक घालुन विनवणी कोणची, तर ” मनाला न्हाऊ घाल” म्हणजे मनाला स्वच्छ कर, पण त्यासाठी मनाला शरीरापासुन वेगळे कसे करता येईल ? […]

श्रध्दारूपेण संस्थिता

अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला  सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी  विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात  उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे : […]

ओळख नर्मदेची – भाग नववा

हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]

ओळख नर्मदेची – भाग आठवा

अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. […]

ओळख नर्मदेची – भाग सात

अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]

ओळख नर्मदेची – भाग सहा

एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..