सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर
त्यानंतर त्यांनी कारदार फिल्म्स मध्ये एक चित्रपट साईन केला . त्या चित्रपटाचे नांव होते ‘ जीवन ज्योती ‘ आणि माझी सहकलाकार होती चांद उस्मानी . त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महेश कौल . त्यानंतर फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ तुमसा नही देखा ‘ मध्ये काम केले. हा चित्रपट १९५७ साली आला. त्याच्याबरोबर त्या चित्रपटात नायिका होती अमिता. १९५९ साली आलेल्या ‘ दिल देके देखो ‘ या चित्रपटात त्यांची नायिका होती आशा पारेख. ह्या चित्रपटापासून त्यांची स्टायलिश प्ले-बॉय आणि प्रेमी हृदयाचा म्ह्णून इमेज निर्माण झाली. […]