क्रिकेटपटू विनू मंकड
प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले. […]