नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

८ वी ड – भाग १

शिक्षक मुलांना शिकवता शिकवता बरेच काही मुलांकडून शिकतो, अर्थात तो हे कबूल करणार नाही. काही प्रमाणिक शिक्षक मात्र हे कबूल करतीलच. मुळातच शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःचा ‘अहं’ बाजूला ठेवला पाहिजे. […]

कवी, गीतकार आनंद बक्षी

आनंद बक्षी …एक शापित ‘ यक्ष ‘ कवी , गीतकार ज्याला कोणी दुर्देवाने कवी मानले नाही , त त्यांनी जी गाणी दिली आणि ते अजरामर झाले , ज्या समीक्षकांनी त्यांना कवी मानले नाही ते मात्र नावापुरतेही उरले नाहीत. […]

क्रिकेटपटू महाराज रणजितसिंहजी

त्यांनी 15 कसोटी सामन्यात 44.95 च्या सरासरीने 989 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 2 शतके आणि 6 अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती 175 धावा तसेच त्यांनी 13 झेलही घेतले. त्यांनी 307 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 24,692 धावा केल्या त्या 56.37 च्या सरासरीने त्यामध्ये त्यांनी 72 शतके आणि 109 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 285 धावा तसेच त्यांनी 133 विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 53 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तसेच 233 झेलही पकडले. त्यांच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक सीझनमध्ये 3000 च्या वर धावा केल्या , त्यांनी 63.18 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी आठ शतके केली. […]

दिग्दर्शक, अभिनेते गजानन जागीरदार

त्यांचा ‘ छोटा जवान ‘ हा चित्रपट खूप गाजला, त्यावेळी तो चित्रपटगृहात दाखवला गेलाच परंतु शाळाशाळांतून दाखवला जात असे. त्या चित्रपटासाठी त्यांना ‘मी विशेष अभिनेता ‘ म्ह्णून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘ दोन्ही घरचा पाहुणा ‘ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा बहुमान मिळाला. […]

सुप्रसिद्ध गायक गजानन वाटवे

गजानन वाटवे यांनी अनेक नामवंत कवीच्या कविता घेऊन त्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या . त्यांची रानात सांग कानांत , आपुले नाते मी भल्या पहाटे येते , दोन ध्रुवावर दोघे आपण , यमुना काठी ताजमहाल , आभाळीचा चांद माझा , चंद्रावरती दोन गुलाब , ती पहा बापूजींची प्राणज्योती , मी निरंजनातील वात , गाऊ त्यांना आरती , तू असतीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे , मोहुनीया तुजसंगे नयन खेळले जुगार.. अशी त्यांची असंख्य गाणी त्यावेळी रसिकांना तोंडपाठ होती. […]

क्रिकेटपटू अजित वाडेकर

अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . […]

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता. […]

सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]

सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. […]

1 40 41 42 43 44 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..