नवीन लेखन...
Avatar
About संजीव सदाशिव गोखले
मी ज्येष्ठ नागरिक असून अधून मधून लिहित असतो, नियमित लेखक होण्याची मनीषा असली तरी अजून झालेलो नाही. यापूर्वी मी आनंदवन हेमलकसा सोमनाथ प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबाबत फेसबुक वर लिहिले आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेबद्दल मी केलेले लेखन ""ब्रह्मांड – एक आठवणे"" या शीर्षकाखाली दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झाले आहे. २००४ साली मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून स्वेच्छा निवृत्त झालो.तेंव्हापासून वास्तव्य पुणे. थोडीफार लेखनाची आवड आहे. कोणत्या एखाद्या खास विषयावर नाही, जे सुचेल ते लिहितो.

दारासिंग ची पिंकी

आजची कथा ही माझी सौभाग्यवती – सौ. सेवा गोखले हिच्या आयुष्यात आमच्या लग्नानंतर घडलेली आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे ती माझ्याही आयुष्यात घडलेली आहे, आणि थोडीशी मोठी आहे. […]

अलक

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत. […]

विवाह (अलक)

नोंदणी पद्धतीने विवाह करून दोघे घरी आले. त्याचा ओसंडून वाहणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय करू आणि काय नको, तिच्याशी काय बोलू आणि काय नको असं त्याला झालं होतं. आईने हातात आणून दिलेल्या कॉफीचा घोट घेत तो तिला म्हणाला- “आज मी फार फार खूश आहे…आनंदात आहे.” “का रे?” “मला तुझ्यासारखी बायको मिळाली.” “म्हणजे कशी?” “शोधून […]

कथा हरवलेल्या वॉलेटची!

नमस्कार मित्रांनो, आजची कथा थोडी मोठी आहे, पण सत्य आहे आणि माझ्याच बाबतीत घडलेली आहे. कथा हरवलेल्या वॉलेटची! […]

नेत्रदान (अलक)

नेहमी लोकलने ऑफीसला येणारा हेडक्लार्क आज पास संपला म्हणून बसनं आला होता. कामातून थोडी उसंत मिळाल्यावर त्यानं हाताखालच्या कारकूनाला बोलावून बसचं तिकीट दाखवलं, आणि विचारल – “हे तकीट बघ, आणि काही कल्पना सुचते का सांग.” कारकूनानं तिकीट उलटं पालटं करून पाहिलं, आणि म्हणाला – “नाही बुवा!” “हे तिकिटाच्या मागे काय छापलंय?” “See world even after death! […]

क्रेडिट कार्ड (अलक)

आयुष्यातलं पहिलंवहिलं क्रेडिट कार्ड घेऊन तो घरी आला. कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं. थोड्या वेळानं म्हणाली, “पोहे करतेय. आठ आण्याची कोथिंबीर घेऊन या.” “आणतो, पण सुटे नाहियेत, तेवढे दे.” “आणा क्रेडिट कार्डावर!”. “?” संजीव गोखले, ०३ जून २०२२.

रेशन कार्ड (लघुकथा)

प्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला. […]

ब्रह्मांड – एक आठवणे !

तसं पाहिलं तर ब्रम्हांड आठवणे, तोंडचे पाणी पळणे, पायात गोळे येणे, मटकन बसणे, जीव भांड्यात पडणे वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो, कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो. पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा वीस मिनिटात येणे हे तसे दुर्मिळच. आम्हा उभयतांना मात्र हा अनुभव आला. त्याचं झालं असं – […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..