चिनी कलेची विविधता – भाग ३
जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच ‘तू’ जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. ‘नवरा मुलगा’ आमच्या शेजारीच होता. सूपचा आस्वाद घेत होतो तोच ‘नवरीला’ बरोबर घेऊन तिच्या ‘सख्या’ जेवणघरात आल्या आणि ‘नवऱ्यामुला’च्या खुर्चीमागे घोळका करून दाटीवाटीने […]