नवीन लेखन...

‘मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. […]

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती (गीत  गणेश)

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. […]

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंचं दर्शन – रिंगणाबाहेरून

‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला […]

वसई : पेहराव संस्कृती

सुरका : वसईकडील मच्छिमार समाजसमूहाच्या पुरुषवर्गाच्या पेहरावातील एक मुख्य प्रकार म्हणजे ‘ सुरका ‘ होय . ‘ जसा देश तसा वेश ‘ याप्रमाणेच जसा व्यवसाय तसा पेहराव हेदेखील आलेच . मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या लोकांना मासेमारीसाठी बोटीतून खोल समुद्रात जावे लागते . उंच बोटीत चढउतार करावा लागतो . तसेच जाळी टाकण्यासाठी पाण्यातही उतरावे लागते . […]

वसई : इतिहासातली आणि आजची

वसई तालुका ५२६ चौ . मैल इतका विस्तीर्ण आहे . पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र , उत्तरेला वैतरणा नदी , दक्षिणेला नायगावची खाडी . पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र यामध्ये वसलेला हा तालुका चहाच्या बशीसारखा ! त्यामुळे पोर्तुगिजांनी या प्रदेशाला ‘ बेकेम ‘ म्हटले तर ब्रिटिशांनी ‘ बॅसीन ‘ . पुढे स्वातंत्र्यानंतर वसई असे नामकरण झाले . या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . बौद्ध राजे ते थेट पोर्तुगीज , ब्रिटिशांनी येथे राज्य केले . […]

सत्यजित रे यांची बायको

चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या. […]

जगातील जुनी योगशाळा – सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट

सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. […]

योगासक्त जीवन व्हावे!

संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस भारतातही साजरा केला जाणार आहे. यामुळे येथे काही उलटसुलट चर्चा रंगायला लागल्या आहेत. याचा येथे विचार करण्यापेक्षा राजयोगाबाबत सांगताना स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते की, “राजयोगाच्या साऱ्या शिकवणुकीचा उद्देश आहे […]

1 2 3 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..