बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे
आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश. सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर […]