एकेकाचे खाणे
रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून. […]