मराठी बिराठी
न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. त्यांना मराठीबाबत असं न्यूनत्व वाटत नाही. ‘अक्षरास हसू नये,’ या वाक्याप्रमाणे ‘भाषेस हसू नये,’ असं कुणी म्हणत नाही. त्यामुळेच केवळ व्याकरणात्मकदृष्ट्याच नाही तर वाक्यरचनेतही प्रचंड चुका असलेल्या जाहिराती […]