दोन हजार मंदिरांचं गाव
नाना फडणविसांच्या वाड्यात शिरण्याआधी दोनशे वर्षाहून जुन्या डौलदार बाओबाब वृक्षाने आमचे स्वागत केले. वाड्याची अवस्था केविलवाणी असली तरी त्याच्या पाठीमागे असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या घाटांचा व मंदिरांचा एकही दगड आपल्या जागेवरून हललेला नाही. तिथेही कृष्णेच्या पाण्याचं डबकं झालं आहे. पण मंदिरांनी सजलेला तो सुरेख घाट डोळ्याचं पारणं फेडतो. […]