Articles by श्रीकांत पोहनकर
कोण कोणाचे गुरु?
अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं. एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या […]
वाडा चिरेबंदी
उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या जुन्या भागातील ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यास्तेतून वेळ काढता […]
लाल दिव्याची गाडी !
कुठले हमीभाव आणि कोणतं आरक्षण, आम्ही करत असतो फक्त स्वार्थाचं रक्षण. मूर्ख आंदोलकांचं नेतेपद स्वीकारायचं आणि मंत्रिपद मिळताच आंदोलनांना शवागारात रवाना करायचं. नेतेगिरी करण्याची आमची हीच पध्दत आहे, एक लाल दिव्याची गाडी, बाकी सब कुछ झूठ है ! श्रीकांत पोहनकर — 98226 98100 shrikantpohankar@gmail.com.
‘ती’
ती सर्वप्रथम माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काही म्हणता काहीही कळत नव्हतं. खरं तर ती कसली माझ्या आयुष्यात येतेय, तिच्याच कृपेने मला या पृथ्वीवर जन्म घेता आला! तिच्याजवळ मला विलक्षण सुरक्षित वाटायचं. आज असंख्य महासंहारक अण्वस्त्रं जवळ बाळगूनही या पृथ्वीवरील अनेक देशांना असुरक्षिततेची भावना रात्रंदिवस ग्रासून टाकते. पण ती कोणत्याही अस्त्राच्या मदतीविना केवळ एका पदराचा उपयोग […]
लेक माझी
अशी कशी लेक देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।। पहिला घास देवा ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।। माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।। कुशीत माझ्या झोपण्यासाठी गाल फुगवुन बसते…. मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।। अशी कशी लेक देवा, […]
बँक रे बँक !
बँकेची भलीमोठी इमारत, काऊंटर नावाच्या भिंतीमागे निर्विकार चेहेऱ्याने लाखांच्या रकमा मोजत बसलेले बँक कर्मचारी नावाचे स्थितप्रज्ञ, ती भिंत ओलांडून आत शिरण्याचे धाडस करून बँकेचे व्यवहार करणारी काही कर्तृत्ववान माणसं, टोकन नावाचे बऱ्यापैकी वजन असलेले पितळी बिल्ले, ते लुकलुकणारे टोकन नंबर्स व आपला नंबर येताच होणारा बेलचा ‘डिंगडाँग’ असा आवाज या सर्व गोष्टींबद्दल मला शाळकरी वयापासून प्रचंड […]
‘स्वतंत्र विदर्भ’ म्हणजे काय रे भाऊ?
दिवसभराचे कामकाज आटोपून आपल्या घरी निघालेल्या एका मध्यमवर्गीय पांढरपेशा वैदर्भीय कर्मचाऱ्याला मी विचारले – ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे का?’ एखादा मनोरुग्ण भेटावा अशा तऱ्हेने माझ्याकडे बघत तो म्हणाला ‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झाला तर नक्की कोणाचे भले होणार भाऊ? केवळ कागदोपत्रीच असणाऱ्या रस्त्यांचे की अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमधील लोणार सरोवराच्या […]
माझा गुन्हा एकच होता ! वरील प्रतिक्रिया
६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही […]
माझा गुन्हा एकच होता !
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत […]