वेड !
सोबत तु असताना, तुझ्यात अथांग रमावं वाटतं…! हात हातात गुंतवूनी, बाहुत निजावं वाटतं…! नजरेस नजर मिळवताच , ओल्या पापण्यांत भिजावं वाटतं…! अबोल प्रीत खुलताना, घट्ट मिठीत शिरावं वाटतं…! बेधुंद बेभान होवूनी , कुशीत तुझ्या विरावं वाटतं…! वेड लावले तुझे मला तू, वेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं …! — श्र्वेता संकपाळ (०६-०३-२०१९)