नवीन लेखन...

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात. त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो ! कर तु तुला हवं ते, ती दणदणीत पाठीवर थाप असते, आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..! काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं, आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..! – श्र्वेता संकपाळ

प्रणय गंध

अंगणात सडा फुलांचा, परी गंध तूझ्या देहाचा, साम्य नाही दोहोंत मुळीच, मला फक्त तू हवा-हवासा! आसुसलेल्या नयन कडांवर, भिरभिरे आता रंगीत वारा, सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा, नभ धरी डोई वर्षाधारा ! चंद्रबिंब तुझ्यात भासे, सूर्यकिरण उरात दाटे, विरहाचे भोगले मी काटे, संयोगाची ही वेळ वाटे ! बाहुपाशाचा वेढा तनुला, नटखट सुटण्याचा माझा चाळा, कुंतला मुक्त, बटा रुळती […]

माझी विठू माउली

विठु माऊली तू माझी, माझ्या माय बापाचा कैवारी, साऱ्या जगताला तारी, ना थकले करूनी पायवारी…. रथ तूझ्या संसाराचा, चालवी माझी रखुमाई, तूझ्या सोबतीने ती उभी, सौभाग्याचं लेनं लेवूनी…. तुळशीमाळ हार तुझिया गळा, साऱ्या भक्ता तू लावसी लळा, मी तुझ्या अंतरीचे लेकरु, पिकव रे सोनं माझ्या मळा…. – श्वेता संकपाळ.

आमचे साहित्यिक

पुस्तकांच्या वनात शब्दांचा खजिना शोधतात, कुंचला अन् लेखणीद्वारे पंचरत्न लुटतात, अनुभवाची शिदोरी कव्यरुपी माळेत गुंफतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात ! कईक प्रश्नतर यांच्या गजल व चारोळी नेच सुटतात, छोट्याश्या लेखातून हिरे मोती लखलखतात, पॉलिश करण्यासाठी हे पुन्हा साहित्यच वाचतात, म्हणे आमचे साहित्यिक खूप भारी लिहितात! नकळत मानवी हृदयावर अक्षर रत्नांची झालर घालतात, रोजच्या रटाळ […]

सोड मानवा

“सोड मानवा , सोड रे ! हे वागणे आहे लज्जास्पद , तुला पाहूनी असे, लाजेल एखादे श्वापद…! भल्या मोठ्या अपेक्षांची भली मोठी रास रचतोस, गैरसमजुतीची ठिणगी पडताच, प्रेम वृत्ती मागे सरतोस…! सन्मान, सचोटी,आदराचा खोटा सोहळा थाटतोस, तुझा हट्ट हेका मात्र शिरतुरा खोचून सांगतोस…! नतद्रष्ठ बुध्दी तुझी रे, अजाणते समज बाळगतोस, सारासार विचार न करता, बंध नात्यांचे […]

विरह

पहाटेच धुकं नजरेसमोर पसरलेलें, आनंदाचा दवबिंदू अलगद पानावर पहुडलेला, अचानक वादळ आलं, अबोल अजानतं, होत्याचं- नव्हतं करत, सर्व नष्ट करून गेलं! मन कशातच गुंतत नाही, आठवण आठवणींची आठवतही नाही, काल होता आज आहे उद्या असेलही कदाचित, काळासोबत अनमोल ते हास्य खुलणार नाही! सहवास होता,सदोदित साथ देणारा, संयम होता, माझे बोल झेलणारा, जिद्द होती, नितांत प्रेम करण्याची, […]

फुंकर

काल कालच्या काळामध्ये, कलून पडला असा कसा? भाव भावनांच्या लगोरिमध्ये, रडत बसला ढसा-ढसा !! भुत-भविष्य तुला न कळती, स्व कुशीत निजलास कसा? कोळ्याच्या जाळ्यात अडकुनी, तडफड करसी, जणु तू मासा !! दवबिंदूंचा पडता सडा अंगणी, तव चुंबन घेता थेट सूर्या, नव ध्येय अन् उम्मेदिने, रूप हिरा चे लाभे तया !! कुंभार तू तुझ्या जीवनाचा, शिल्प घडवण्या […]

समाज

होऊन गेले नकळत सारे, सुचले मला काहीच नाही, होकार फक्त मनाचा, मेंदूला त्याची कल्पना नाही… समाज ठेवतो सतत नावं, करतो त्याची कुजबूज…! असते ती फक्त छोटीशी चूक, वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा, करतो एक,भोगतो एक, मात्र मज्जा बगतो समाज सारा… अहो, खरं कोन? समाज की मी? या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं ज्याला जसे पाहायचे तो […]

व्यथा एका शेतकऱ्याची

कोणी म्हणे बाप माझा शेतकरी, झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी, घेवून वाड वडिलांची आण, बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण.. जवान मरतो देशासाठी, लाभते त्यास वीरमरण प्राप्ती, मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी, तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी… अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई, निसर्ग कोपाची भलतीच घाई, उजाड माळरान फाटकी धरती, कळोखांचा नभ डोळ्यांनभावती… मान- सन्मान- सत्ता नाही, काळी काया, हाडावर मुठभर मांस […]

नशा

नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली ! मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने ! दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले ! कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास, […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..