नवीन लेखन...
Avatar
About सुरेश कुलकर्णी
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

रुद्रा – कादंबरी – भाग ४

राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग ३

इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग २

रुद्राच्या बोटाला सिगारेटचा चटका बसला तसा तो भानावर आला. वेटरने खुजराहोच्या (बीअर ) तीन बाटल्या,  चखणा म्हणून  खारे काजू, कलेजी फ्राय,आणि फोरस्क्येयर पाकीट सोबत ठेवले होते. दोन बाटल्या पोटात गेल्यावर त्याने तिसरीला हात घालणार, तोच त्याचा फोन वाजला. नम्बर अननोन होता.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग १

या गोष्टीची सुरवात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी झाली होती. ‘लैला’नावाचे एक ठिकाण आहे. त्याच्या खालच्या मजल्यावर हुक्का पार्लर आणि त्या वरच्या मजल्यावर बार आणि रेस्टोरंट आहे. नावाने हुडकायला गेलात तर सापडणार नाही. कारण त्याचा कोठेही साइन बोर्ड नाही. पण माहितगारांना असल्या गोष्टींची अडचण पडत नाही! रुद्राचे हे नेहमीचे ‘विरंगुळ्याचे ‘ठिकाण. […]

प्लीज येवू दे ना !

बाहेरच चमकदार निळसर आकाश,त्या खाली नुकताच पिंजलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग,सुनीलला विमानाच्या खिडकीतून दिसत होते. खिडकीशेजारचा विमानाचा पंखा,त्या मावळतीच्या सोनेरी सूर्य प्रकाशात तळपत्या तलवारीच्या पात्या सारखा भासत होता. ‘विरोध करणाऱ्याला कापून काढीन ‘ असा त्याचा अविर्भाव होता. […]

फरिश्ता !

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. […]

भयानक स्वप्न !

रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज. […]

हे सार थांबवा ! प्लीज !!

ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती.  त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक  दरवाजा होता.  तो ही पांढरा फटक! […]

गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता. […]

थ्रिल !

‘कर्ता करविता परमेश्वर आहे !’ या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ‘ती ‘हि  तोच करतो.मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते.अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो ,आणि इतरजण ‘मी केले!’ किवा ‘मी करून दाखवले का नाही ?’म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात! […]

1 8 9 10 11 12 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..