डोके ज्याचे त्याचे
झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]