मंचकमहात्म्य
मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही ! […]