Articles by सुरेश कुलकर्णी
शंकर मुडके!
सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच. […]
ऑटो भास्कर!
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो. […]
किचन गुरु!
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो. […]
प्रल्हाद!
गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी(आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. […]
लेखक होण्यास काय लागतं ?
तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला ‘लेखक’ होण्याची लहानपणापासूनच मोठी हौस होती. (म्हणजे अजूनही आहेच! तसे आम्ही याबाबतीत, मराठीत चिवट, आणि इंग्रजीत ‘नेव्हर गिव्ह अप’ मधले.) पण लेखक व्हायला काय लागते? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता, पन्नाशी कधी उलटून गेली कळलच नाही! […]
भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५
आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.) […]
खोटारडी आई! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १४
जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे! […]
नो सॉरी! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १३
प्रत्येक पोराला ‘पराठे’ आणि मुलींना ‘कराटे’ आले पाहिजेत. हि आजची गरज होऊ पहात आहे. बेफिकीर मायबाप, मोकाट पोर, नवतारूण्याचा माज(जोश असायला हवा!) हे कोण अन कस आवरायचं? प्रश्न आपलेच आहेत. आज दारात असतील. उद्या घरात येतील! उत्तर शोधायला हवीत. […]
मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२
‘कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो! […]