नवीन लेखन...
Avatar
About डॉ. संतोष जळूकर
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

भारताची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने ही घोषवाक्य काळानुसार रचली गेली. सध्या सुशिक्षित वर्गात एक अपत्य किंवा फार तर दुसरे अपत्य असते असे प्रत्यक्षात आढळते. क्वचित प्रसंगी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणजे शिवाय सरोगसी पण आता प्रचलित होऊ लागली आहे. ऐहिक सुखांच्या उपभोगासाठी मुले न होऊ देण्याची ही प्रवृत्ती निसर्गचक्राच्या विरुद्ध आहे. […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

२२) मांसाहार करावा की नाही? (Is non-veg good): जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते. म्हणून आठवड्यातून एक वेळा मांसाहार घेण्यास हरकत नाही. मात्र मांसाहार शक्यतो […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ५

१८) मानसिक असंतुलन (Mental instability): मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते. हे सर्व वैयक्तिक स्वभावशी निगडीत आहे. […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ४

११) शारीरिक थकवा (Weakness) – शरीराला अनेक कारणांमुळे थकवा येतो. रक्तात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता, रक्तातील लोहाचे (हिमोग्लोबिनचे) प्रमाण खालावणे, अत्यधिक श्रम, उन्हात फिरणे, प्रदीर्घ आजार अशी शेकडो कारणे मिळतील. कारण शोधून मग त्यावर उपाय करणे नक्कीच योग्य असते. तरीही ज्याने लगेच तरतरी वाटेल आणि शरीराला पोषणही मिळेल असे काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. अशावेळी […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ३

वृद्धापकाळात होणारे मुख्य आजार आणि संक्षिप्त उपचार २) हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) – उतार वयात हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. सुरुवातीला त्याची फारशी काही लक्षणे दिसत नाहीत पण लहानशा आघातमुळे पटकन हाड मोडण्याची (fracture) शक्यता वाढते. अशा वयात अस्थिसंधान (हाडे जुळून येणे) होणे कठीण असते, लवकर झीज भरून निघत नाही शिवाय वयोपरत्वे हालचाली […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग २

१) वृद्धापकाळातील सामान्य नियम – रोगानुसार आहार, पथ्यपाणी, व्यायाम किंवा दिनचर्या या सर्व गोष्टींमध्ये बदल करावे लागतीलच, परंतू काही गोष्टी उतारवयात सर्वांनीच कराव्यात. त्यात प्रामुख्याने लक्षात ठेवून करण्याच्या गोष्टी कोणत्या ते समजून घेऊया. १. साजूक तूप आहारात नियमितपणे घ्यावे. आयुर्वेदानुसार तूप म्हणजे वृद्धमित्र. वजन वाढेल किंवा कॉलेस्टेरॉल वाढेल या भीतीने बरेच लोक तूप / तेल कटाक्षाने […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग १

आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते. […]

अस्वच्छतेला जबाबदार कोण?

शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं? […]

प्लास्टिकला करुया हद्दपार

आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन. […]

कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी

हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे. म्हणूनच “सर सलामत, तो पगडी पचास” अशा म्हणी प्रचारात […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..