नवीन लेखन...
Avatar
About डॉ. संतोष जळूकर
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

खाद्य तेले – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

खाद्य तेले आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी […]

दातांची काळजी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दातांचे महत्व – आहारातून उदरात जाणारा अन्नाचा प्रत्येक कण शरीराला पोषण देणारा असतो. अन्न चावल्याने त्यावर सर्वप्रकारच्या पाचक स्रावांचे सुयोग्य संस्कार होऊन शरीराला पोषण मिळते. ह्या प्रक्रियेत सर्वात पहिली जबाबदारी असते दातांची. अर्थात ह्यासाठी दातांचे आणि त्याचबरोबर हिरड्यांचे स्वास्थ्य उत्तम असणे नितांत गरजेचे आहे. “एक घास बत्तीस वेळा चावावा” हा वाक्प्रचार ह्यातूनच रूढ झाला आहे. अन्न […]

प्लास्टिक – स्वास्थ्याचा टाईम बॉंब

प्लास्टिकचा अति वापर किती धोकादायक आहे हे मला समजले. हा धोका नेमका काय आहे हे इतरांनाही समजावे म्हणून हा विषय थोडक्यात . . . . ! प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे. मागणी तसा पुरवठा ह्या […]

गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९ मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे अपान वायूचे कार्य आहे. कोणतेही […]

कानात दडे, बहिरेपणा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे. आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर […]

रघुवंशातील दिलीप राजा – गोष्टीतील शास्त्रीय विचार

श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा प्रसिद्ध आहे. रघुवंशातील थोर राजा दिलीप व त्याची पत्नी सुदक्षिणा यांना धन, धान्य, समृद्धी सर्वकाही परमेश्वराने ओतप्रोत दिले होते. परंतु निपुत्रिक असल्याने त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख असते. पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषि त्या दाम्पत्याला नंदिनी गाईची सेवा करण्यास सांगतात. ह्या सेवाव्रतामध्ये नंदिनी गाय ज्या ठिकाणी जाईल त्याठिकाणी तिच्याबरोबर दोघांनी जावे, ती बसेल तेव्हांच […]

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. पण का?

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. मी स्वतः इंग्लंड, अमेरिका आणि सर्व स्कॅन्डीनेव्हियन देशांमध्ये भरपूर प्रवास केला आहे. वास्तविक ह्या देशांमधील खाण्यापिण्याच्या सवयी पहिल्या तर आपल्यापेक्षा जास्त गोड पदार्थ त्यांच्या जेवणात असतात. तरीदेखील भारताला मधुमेहाचा हा शाप का? ह्याविषयी सर्वात मुख्य लक्षात आलेला मुद्दा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा. ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अगदी न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये […]

लहान वयात दृष्टिदोष

आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर […]

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते. नेमके कारण शोधून त्याची चिकित्सा केल्याने गर्भधारणाहोणे शक्य असते. नेमके कारण लक्षात आले नाही तर मात्र स्त्रीलाच दोषी ठरवून ‘पुनर्विवाह’ करण्याची मानसिकता अजूनही भारतात, विशेषतः अशिक्षित किंवा अति उच्चभ्रू समाजात […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..