४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
(कांहीं मुक्तक) मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे ।। मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’ ।। ‘मद्य मद्य’ करुं या हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे ।। पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे […]
(काहीं मुक्तक) या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं ।। मंजूरच साऱ्या शर्ती, चला रे पीत बसूं श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं ।। ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ।। ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं ती नित्य देतसे स्फूर्ती […]
डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला. […]
युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले. […]
सरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’. […]
बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली. […]
बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे. […]
राम : ( दशरथाला) – शोक आवरा अपुला, आणिक निरोप द्या आतां करील तुमची वचनपूर्ति हा सुत मोदें, ताता ।। १ ब्रीद हेंच आपुल्या कुळाचें – ‘वचन दिलेलें पाळायाचें’ माझ्या प्रेमापोटीं कां कर्तव्याला चुकतां ? २ वचनपूर्तता तुमची व्हाया सिद्ध असे मी वनात ज़ाया भाग्य म्हणूनच मला लाभला तुम्हांसमान पिता ।। ३ पुत्रनीति जी आहे सक्षम […]