४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं […]
गझल हे काव्य खरे, पण ते गेय काव्य आहे. त्यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्वाद घेतांना सुद्धा ‘ध्वन्य’ पद्धतीने वाचावी, म्हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल. […]
मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें खाली देत आहे. यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल. […]
ग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या. […]
हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें. […]
नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे. परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया. […]
समाजातल्या मेजॉरिटीपेक्षा भिन्न असलेल्यांना बरेच कांहीं सोसावें लागतें, कारण समाजातील प्रथा, परंपरा या, केवळ मेजॉरिटीला ध्यानात घेऊन बनवलेल्या असतात. मात्र, अशा परंपरा भूभागसापेक्ष, संस्कृति-सापेक्ष व कालसापेक्ष असतात. काळाबरोबर जसजसा समाज बदलतो, तसतसे मान्यताप्राप्तीचे निकषही बदलतात.
‘LGBTQI’ कम्युनिटीला गेली अनेकानेक शतकें-सहस्त्रकें समाजरोष पत्करावा लागला आहे, अन्याय्य असा एक ‘डाग’ बाळगत जगावें लागलें आहे. जें कांहीं Natural ( पण मेजॉरिटीपेक्षा भिन्न) आहे, ते समाजानें, सरकारनें आणि न्यायपालिकेनें आजवर शिक्षापात्र गुन्हा मानलें होतें. मात्र, आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर पुनर्विचार करण्याचें ठरवलें आहे. त्यातून या कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा करायला हरकत नाहीं. […]
गर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ? […]