रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन
सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]
सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]
गीत रामायणाचें बर्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलें आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती. त्यामुळे, त्याचें हिंदी भाषांतर आधीच झालेलें असूं शकेल याची मला कल्पना होती (आणि, तशी परिस्थिती खरोखरच होती, हें नंतर मला समजलेंच). मात्र, मी त्यावर मोहित झालेलो असल्यानें, आपण हें भाषांतर करायचेंच असें मी ठरवलें. यात ‘स्वान्त:सुखाय’ अशा आनंदाचाच भाग होता ; व्यावसायिक कांहींही नव्हतें (आजही नाहीं ). […]
सुरेश भट आणि दुश्यंत कुमार हे दोघेही श्रेष्ठ ग़ज़लगो आहेत, हें निर्विवाद. मात्र, ज्या ग़ालिबच्या शायरीची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेली आहे, त्याच्या तुलनेत भट आणि दुश्यंत यांना कुणी ज्ञानवंत कदाचित् तुल्यबल ठरवूंही शकेल, पण त्यांना श्रेष्ठतर मात्र मुळीच ठरवूं शकणार नाहीं. […]
महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या. […]
ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ? फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’ ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें – ‘चालेल मज […]
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“ पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा . मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा . तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . असतीच केली तुसवें तुलना तयाची, साजणी पाहिला नसता कधी जर चंद्रम्यावर डाग मी . […]
जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही ।। ”होळीचा सण अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” ; ”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ? ‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती” ।। सर्वांपुढे निजदु:खा […]
आला मान्सून, मान्सून आला सज्ज-सज्ज स्वागताला तुंबलेला नालान् नाला. कचरा-डोंगर गटार-सागर अशक्य उल्लंघन हनुमंताही. रामानें शिवधनू भंगलें. पण, त्याआधीं प्रदूषणानें अर्धवट होतें खाल्लें. त्रिशंकू आहे आजचा माणूस. प्रदूषणाला स्वीकारत नाहीं अन् मारतही नाहीं. विश्वामित्राची प्रतिसृष्टी कुठे आहे, शोधूंया चला. पण सावध! तिथेंही प्रदूषण असेल! व्यास रचणार कसें हें महाभारत ? गणपती लिहिणार कसा ? हा प्रदूषण-विजय […]
शीळ वाजवीतो वेळूमध्ये वारा जसा मुलींना बघून कुणी टारगट पोरगा . – रानोमाळ धावतांना वेग अफाट वार्याचा नांव प्रेयसीचें घेतां जसा हृदयाच्या ठोक्यांचा . – नेतो त्याच्यासंगें वारा ढगांना ओढून जशी युवती सुंदर खेची तरुणांचे मन . – खेळतसे लपंडाव सूर्य मेघांबरोबर दिसे, वात्रट कोणी मारी डोळा, पोरीच्या समोर . – क्षितिजावर नभांत जाई भूमी मिसळून […]
मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’ ।। ‘मद्य मद्य’ करुं या हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे ।। जरि असलो आम्ही […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions