४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ; पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ […]
स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वतंत्र-भारत सत्तरीचा अन् मीही सत्तरीचा दोघांचें वय एकच . १ मी म्हातारा झालो पण देशाचें लोकतंत्र अजून बाल्यावस्थेतच आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात सत्तर वर्षें ती काय ! २ माझ्यासारख्या अनेकांना हा देश पुरून उरेल. माझ्यासारख्या अनेकांना गाडून, ‘पुरून’, हा देश उरेल ? ३ आम्ही तर देशासाठी कांहीं पुण्यकर्म केलें नाहीं म्हणा […]
निष्कर्ष आणि समारोप : मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक (a must) वाटत नाहींत […]