४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
जीवन , प्रेम , आनंद , वगैरे ; आणि मरणोच्चार : मरणाचा विचार-उच्चार can be with reference to a number of things, मग तें जीवन असो, प्रेम असो, राष्ट्रभक्ती असो, वा अन्य कांहीं असो. आपण कांहीं उदाहरणें बघूं या. Life hurts a lot More than Death. – Death is not the greatest loss in life ! […]
गीत : ( भावगीत, सिनेगीत, ग़ैरफ़िल्ली गीत, लोकधारा, पोवाडे, आरत्या, उखाणे इ. ) – गीत हें खरें तर पद्यच आहे. लयबद्ध काव्य चालीवर गाइलें की त्याचें गीत होतें, तें भावगीत असो, सिनेगीत असो, लोकधारेमधील गीत असो वा अन्य कसलेंही असो. भावकविता आणि भावगीत हे किती एकरूप आहेत हें आपल्याला माहीतच आहे. ( भावकविता आधी आली, म्हणजे […]
[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] कविवर्य ग्रेसांचें कांहीं काव्य पहा – डोंगरापुढे कल्लोळ, अलिकडलें सर्व निवांत निजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत । – खोल उठे काळाचा गहिवर जळे सतीची चिता एक विराणी घेउन, मृत्यू सदैव फिरतो रिता. – चुकून संध्याकाळी जिवलगाच्या मृत्यूची बातमी आली तर कुणालाही सांगूं नये. – ‘अंगसंग’ याला ग्रेस […]
[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] मृत्यूचा उल्लेख असलेली , काव्याची आणखी कांहीं उदाहरणें पहा – आतां जायाचंच की कवातरी पट्.दिशी वसंत बापट – मरणाच्या मुहूर्तावर ओठीं गाणं ओथंबून यावं. सदानंद रेगे – कोणत्याही क्षणीं आम्ही जीवनाच्या प्रवाहातून मरणाच्या कुरळ्या लाटा कधीच वेगळ्या केल्या नाहींत करूं शकलो नाहीं , करूं इच्छीत नव्हतो आणि हेंही आमच्या […]
मराठी काव्य : भाग ८-अ मराठीत अनेक जुन्यानव्या कवींनी त्यांच्या काव्यात मृत्यूचा उल्लेख केलेला आहे. पाहूं या कांहीं उदाहरणें. आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें, झाशीच्या राणीवर स्फूर्तीप्रद काव्य लिहिलें, ‘रुद्रास […]
( रक्षाबंधनाच्या निमित्तानें : बालकाव्य ) रुसू नको गऽ ताई, फुगवुन् गाल तुझे तू नको बसू फुगा फुटू दे रुसव्याचा हा, अन् ओठी येउ दे हसू ।। नको रागवू ताई , होती गंमत ही खेळामधली चिडले कोणी तर डावातिल मजा निघुन जाते सगळी राग कधी नाकाच्या नकट्या शेंड्यावरती नये असू ।। फुगा फुटू दे रुसव्याचा […]
(नारळीपौर्णिमेनिमित्त बालकाव्य) (चाल : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना) देवाची करणी , नारळांत पाणी आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।। नारळाला पाहुन् करीं फळाला पकडुन् आश्चर्यचकीत होती सगळे, गुण याचे ऐकुन् । सगळे, गुण याचे ऐकुन् । दगडासम हा बाहेरुन् पण अति-मृदु असतो आतुन् म्हणुनच कां पसंत केलें नर-वानर-देवांनी ? नर-वानर-देवांनी ? […]
[ उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य : ( पुढे चालू ) ] उर्दू काव्य: प-ए-फ़ातहा कोई आए क्यों, कोई चार फूल चढ़ाए क्यों कोई आके शम्मा जलाए क्यों, मैं वो बेकसी का मज़ार हूँ । बहादुरशाह ज़फ़र ( ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. […]
श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा. […]