४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख. […]
1 पाहिजे तेवढं Brain-Storm पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? 2 Brexitच्या प्रत्येक विकल्पाला MP म्हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. 3 MP बसलेत डोकं खाजवत UK च्या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! 4 ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ की, मतदानावर मतदान चाललंय् पण निघतच नाहीं […]
UK निघालंय् काडीमोड घ्यायला EU पासून देशाच्या भवितव्याची बाब आहे ही. पण MPs वागतायत् असे, की जगात UK ला काडीची किंमत राहिली नाहीं. EU मोडतंय् बोटं पण तें बेटं करणार काय ! ब्रेक्झिटवाल्या UK ला ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणणं आहे प्राप्त, नाहीं अन्य उपाय. कोण द्वाड? EU की UK? कोण unreasonable? EU की UK? कोणाला […]
‘मैं ख़याल हूँ किसी और का … ’ ही गझल मेहदी हसन यांनी ( व इतर प्रसिद्ध गायकांनीही) गाइलेली व सलीम कौसर या पाकिस्तानी ग़ज़लगोनें (गझलकार) लिहिलेली आहे. (मेहदी हसन यांनी आपल्या गायनाच्या आधी या गझलगोचा उल्लेख केलेला आहे). […]
अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा… ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. “वीस एक एकवीस”, “वीस दोन बावीस” वगैरे. या पद्धतीवर बर्याच लोकांचा आक्षेप आहे. […]
हा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते. उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात. […]
गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा. […]
कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. […]