४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल : ‘संस्कृतच काय कुठल्याही भाषेचा निषेध करणें हितावह नाहींच’, हें मांदळे यांचें म्हणणें योग्य आहे. मात्र, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबा यांच्या काळीं मराठी ही जनभाषा बनलेली होती. त्यामुळे, संस्कृतच्या निषेधासाठी नव्हे, तर जनसामान्यांच्या भाषेत ज्ञान आणण्यासाठी या सर्वांनी प्रादेशिक भाषेत लिहिलें. इतरत्रही आपल्याला मध्य युगात हेंच दिसतें. कबीर, तुलसी, सूरदास, मीराबाई, […]
हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिसादाबद्दल : हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दे समर्थपणें हाताळलेले आहेत, मी basically त्यांच्याशी सहमत आहे. केवळ कांहीं गोष्टींचा थोडासा ऊहापोह. ‘या विषयाची संगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती’ ( इति राजोपाध्ये) : याबद्दल माझें मत मी शेवटी मांडणार आहे. आत्तां इथें त्याची चर्चा केल्यानें विषयांतर होण्याची भीती आहे. पहा परिशिष्ट […]
माधवी जोशी यांच्या प्रतिक्रियेबद्दल : माधवी जोशी यांच्या मुद्द्यांशी मी basically सहमत आहे. एकदोन गोष्टींचा थोडाफार खुलासा. मॅक्सम्युलरबद्दल आपण आधी पाहिलेंच आहे. मेकॉलेच्या भारतविषयक मतांबद्दल इथें मुद्दाम लिहायची आवश्यकता नाहीं. मेकॉले इंग्लंडला परत गेल्यावर, आपल्या ‘scheme’ च्या पूर्तेसाठी योग्य माणसाच्या शोधात होता. त्याला मॅक्सम्युलर सापडला. मॅक्सम्युलरला इंग्लंडमधून त्याच्या रिसर्चसाठी grant मिळत होती, याचा उल्लेख आपण आधी […]
सुशिम कांबळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल : ‘कॉलोनियल-इरा’मधील इंग्रजांची बाजू घेण्याचें मला कांहींच कारण नाहीं. मात्र, इंग्रजांनी मुद्दाम मोजक्या लोकांना(च) इंग्रजी शिकवली, असें म्हणणें बरोबर नाहीं. जे लोक socio-economically एका विशिष्ट, upwardly mobile वर्गात होते (जात कुठलीही असो) , ते अशा भाषा शिकतातच, मग ती संस्कृत असो, मध्य-युगात फारसी असो, वा आधुनिक काळात इंग्रजी, (किंवा गोव्यात पोर्तुगीझ, व […]
संजय सावरकर यांच्या प्रतिसादाबद्दल : संस्कृत भाषेला ‘देववाणी’ कां म्हणत याच्या मागचा इतिहास आपण आधीच पाहिला आहे. तिचें वर्चस्व लादण्यासाठी तसें नांव ठेवलें गेलें नाहीं. ‘देव’ या टोळीची (clan) जी भाषा, तिला ‘देववाणी’ म्हणणें हें अगदी स्वाभाविक आहे. इंग्रज लोकांची भाषा ती इंग्लिश , फ्रेंच लोकांची भाषा ती फ्रेंच, बंगालमधील बंगाली, ‘मराठ’ भागातली ती मराठी. सर्वसाधारणपणें […]
भाग – (२) – (ब) ईशान्य भारत : निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं. (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ; किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या […]
मोरे यांच्या लेखातील कांहीं statements च्या योग्यायोग्यतेची चर्चा केल्यानंतर, त्या लेखावरील प्रतिक्रियांचा विचार करणेंही आवश्यक आहे. (लोकसत्ता दि. १३ मे, लोकमानस ; १४ मे चा विशेष लेख ; व २० मे आणि २१ मे च्या लोकसत्तामधील प्रतिक्रिया). भाग – (२) – (अ) निखील जोशी, बंगळूरु यांच्या प्रतिक्रियेबद्दल : तमिळनाडु , व आधीचा–काळ : निखिल जोशी यांनी […]
प्रिय हा अती श्रीगणपती देव लाडका नाहीं जगीं कोणी गणेशासारखा ।। तुंदिलतनू, सोंडेमधें मोदक धरी तोलीतसे भरलें तबक हातावरी एकवीस हा नैवेद्य प्रिय या गजमुखा ।। मांडीवरी पद ठेवुनी ऐटित बसे तोंडावरी स्मित नेहमी विलसत असे हातीं धरी निज-दंत मोहक मोडका ।। बांधीयलें अपुल्या कटीवर फणिधरा त्या बंधनें सांभाळिलें पीतांबरा जागा दिली पायींच […]