४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
हे गणस्वामी, हे गणनाथा, हे श्रीगणराजा विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा ।। हस्तिमुखा हे, महाकर्ण हे, हे श्रीगजानना, वक्रुतुंड हे, एकदंत हे, हे श्रीगजवदना, हेरंबा, श्रीगणेश, मोरेश्वरा, धुंडिराजा ।। विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा ।। ऋद्धिसिद्धिस्वामी, विघ्नेश्वर, हे गौरीतनया, हे चिंतामणि, भालचंद्र, दंती, श्रीगणराया, धूम्रवर्ण हे, शूर्पकर्ण हे, नमन विघ्नराजा ।। विविध शुभंकर नामीं […]
भाग – ५ आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या […]
भाग – ४ अवतारकल्पना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचें प्रतिबिंब आरत्यांमध्येही दिसतें. ‘दशावतारांची आरती’ तर आपल्याला दिसतेच, पण इतर आरत्यांमध्येही अवतारांचा उल्लेख येतो. ज्ञानदेवांच्या आरतीत ‘अवतार पांडुरंग’ असा उल्लेख आहे, तसाच तो नामदेवांच्या आरतीतही आहे (‘पांडुरंगे अवतार’). रामदासांच्या आरतीत, शंकर-मारुती-रामदास असा अवतारांचा उल्लेख आहे, ‘साक्षात शंकराचा अवतार मारुती । कलिमाजी तेचि जाली । […]
भाग – ३ आपण आरतीची कांहीं वैशिष्ट्यें पाहूं या. आरतीत आराध्य/उपास्य दैवताचें वर्णन असतें, जसें गणपतीच्या आरतीत, रत्नखचित फरा, चंदनाची उटी, हिरेजडित मुकुट, पायीं घागर्या, पीतांबर, इत्यादी वर्णन केलेलें आहे ; शंकराच्या आरतीत, विषें कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, व्याघ्रांबर, वगैरे वर्णन आहे ; विठ्ठलाच्या आरतीत, पीतांबर, तुलसीमाळा, कटीवर हात, इत्यादी वर्णन आहे . आराध्य/उपास्य हें ‘संत’ […]
भाग – २ अर्चनेचे प्रकार आपल्याला वैदिक काळापासून दिसून येतात. वैदिक ऋचांमध्ये वेगवेगळ्या देवतांना वंदन व त्यांची स्तुती केकेली आहे. उदाहरणार्थ,अनेकांना परिचित असलेला गायत्री मंत्र. ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यम्’ हा गायत्री मंत्र, सूर्याची वंदना करणारा मंत्र आहे. इंद्र, मित्र-वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) यांची अर्चना होत असे, हें आपण आधी पाहिलेंच आहे. तसेंच, उषा, सरस्वती नदी यांची स्तुती करणार्या वैदिक […]