४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल. • सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं […]
• आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं […]
बातमी : विठ्ठल-रखुमाईचें दर्शन आतां २४ तास संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. ७ जुलै २०१६ • हिंदू देव-देवतांची एक गंमत आहे. माणसांप्रमाणेंच मंदिरातली मूर्ती दुपारीं वामकुक्षी करते, आणि रात्रीं शयन करते. (भक्तांनी दर्शनासाठी वाट पाहिती तरी चालेल !) मग, पहाटे काकड-आरती करून देवाला ज़ागवतात! काय गंमत आहे पहा : दैवत्वाचे गुण माणसाला लागण्याऐवजी, माणसाचे गुणच […]
भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।। आस एक – पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा ध्यास एकमात्र – मोक्षद बघिन पांडुरंगा एकमात्र भास – दिसतें रूपडें अवीट रे ।। स्वप्नवत् जहालें – गेलो पंढरिनगरात मी भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।। तेज आगळें विठूच्या सावळ्या […]
चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १ जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे मूर्ती दारामागुती लपे भलीथोरली वारकर्यांची दारीं रांग अडे ।। २ पांडुरंग अन् भक्तांमधलें हवें कशाला अंतर असलें ? दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३ आतां विठुला निद्रा नाहीं अष्टप्रहर तो दर्शन देई आतां त्याला भेटायाला […]
सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे विठुरायाच्या वारकर्यांना उघडें मंदिर आहे ।। विठुराया ज्यांचा सांगाती नाहीं त्यांना ज़ातीपाती उच्च-नीच नाहीं, सार्यांना उघडें मंदिर आहे ।। उभे पुजारी-सेवक-बडवे कुणि न विठूच्या भक्तां अडवे अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।। प्रपंच विसरुन केलिस वारी अजुन थबकसी कां बाहेरी ? कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।। हातांमध्ये […]