४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा […]
मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील एक प्रतिक्रिया श्री. किशोर मांदळे यांची आहे . ( टीप : मोरे यांच्या लेखातील मुद्द्यांचा व त्यावरच्या विविध प्रतिक्रियांमधील मुद्दयांचा परामर्श मी एका वेगळ्या दीर्घ लेखात केलेला आहे. ज्यांना […]
बातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा – लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६. ‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते की बदलापुरनजीक शिरगांव येथें शिलाहारकालीन, ‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ इत्यादी प्रकारची शिळाशिल्पें सापडली आहेत. शिलाहार हे राष्ट्रकूटांचे अंकित होते, व त्यांचे कोंकण, दक्षिण महाराष्ट्र भागात राज्य होते. बदलापुरनजीकाचा भाग ‘उत्तर कोंकणा’वर राज्य करणार्या शिलाहार-शाखेकडे होता. हा काळ होता […]
बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ? संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६. ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे. पिढ्या बदलल्या की विचार बदलूं […]
बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला. हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच […]
२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी व मंदाकिनी या नद्यांवर (हायड्रोइलेक्ट्रिक वीजनिर्मितीसाठी) धरणें बांधणें हें गंगेसाठी घातक ठरेल , नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होईल , आणि अर्थातच, […]