४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या ! पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे. पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी […]
आपापल्या महालात तुम्ही सर्वेसर्वा असता, मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे सरदार असा किंवा शिलेदार. बाहेर पडल्यावर मात्र तुम्ही बनता जगातील कुणीतरी, लहानमोठे. कुणापुढे तरी तुम्हाला झुकावं लागतं . पण , आणखी कुणाला तरी तुम्ही स्वत:पुढे वाकायला लावता . आणि त्यामुळे , फक्त त्यामुळेच , तुम्ही मोठे मोठे बनत जाता – डोंगराएवढे पर्वताएवढे . पण , […]
श्री. साळुंखे यांनी ‘मराठी सृष्टी’वर, ‘मला एक प्रश्न पडलाय’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी ‘छत्रपती’ या शिवाजी महाराजांच्या बिरुदाबद्दल चर्चा केली आहे . प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला शिवरायांच्या ‘छत्रपती’ या अभिधानाबद्दल कुतूहल असतेंच. साळुंखे यांनी तो शब्द ‘क्षेत्रपती’ या शब्दापासून निघाला असावा असें मांडलें आहे. त्यांनी दाखवलेला अर्थ सराहनीय आहेच. शिवराय हे ‘श्रीक्षेत्र महाराष्ट्राचें’ […]
एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें. […]
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]
(०१.०४.२०१६) मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या […]