४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे. […]
आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्का बसला ? पण खरोखरच सांगतो, आपल्या उन्नतीसाठी आपल्यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे. […]
आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानें सगळीकडे आम्हांस ते त्यांच्या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्त्रास्त्रनिर्मिती करणार्या परदेशी कंपन्या चालाव्यात म्हणून अविकसित देशांना शस्त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्या हानिकारक उत्पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्यांना पुरवलें जातें. […]
आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्हणजे अशी शंका मांडण्यापूर्वी त्यांनीं कांहीं गोष्टी ध्यानांत घ्यायला हव्या. एक म्हणजे भारतातील हवामान. भारतातल्या मान्सूनच्या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्य ऐतिहासिक सत्यही येथें लक्षात घ्यायला हवें. […]
आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्वस्थ बसायचं कां? आपल्या जनजीवनात, व्यापार-व्यवहारात इंग्रजीच्या तुलनेने आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान मिळूं नये, असं आम्हाला जर वाटत असेल, तर आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्यासाठी झटलं पाहिजे. त्यासाठी करायच्या काही गोष्टींकडे आपण एक नजर टाकू. […]
भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्वेच्छेने पत्करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक आहे हे किती लोकांच्या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ? […]
एक गोष्ट आम्ही ध्यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्येने त्याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]
प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी. […]
भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्वही विचारात घ्यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्कृतच्या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री ह्या भाषा अस्तित्वात होत्या. […]