४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
१७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्यानात घेऊनच. शाहूला स्वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्यासाठी त्याच्या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्यातील हिस्सा त्याला दिला की तो खुष होता. […]
मराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या. […]
टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट.. […]
अठराव्या शतकात मराठी सत्तेने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भारताचा बराच भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्लीला धडक दिली वा दिल्ली काबीजही केली पण ते दिल्लीपती झाले नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्याचा मराठी भाषा, संस्कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्या स्वाभिमानामुळे आणि आपल्या आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट वृत्तीमुळेच मराठे दिल्लीच्या उंबरठ्यावरच राहिले, दिल्लीपती झाले नाहीत. […]
आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे ! […]
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा ! […]
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना ! […]