४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. […]
अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली. […]
सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें. […]
गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! ) […]
जर गुरू, capable असेल, worthy असेल, तर त्याला ( मक्केतील ‘काबा’ प्रमाणें ) पवित्र मानावें , श्रेष्ठ मानावें, (त्याला वंदावें) . पण जर गुरू नाक़ाबिल असेल, ( ज्ञान अथवा आचार-विचारानें) capable नसेल, worthy नसेल, तर, (तौबा, तौबा!) , अशा गुरूपासून दूरच रहावें ! (तेंच श्रेयस्कर). […]
(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद ) अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।। बनुन सुरांचा दीन भिकारी, गुरुराया, आलो मी दारीं सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान त्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा ।। द्या मला तुम्ही दीक्षा ।। पसरवीन मी तुमचे सूर जगीं अशान्ती करीन […]