सिंघम
पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोरानें मी करी ओरडा चिंगम चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात. – चिंगम : Chewing Gum – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)
पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोरानें मी करी ओरडा चिंगम चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात. – चिंगम : Chewing Gum – सुभाष स. नाईक ( ९८६९००२१२६)
आज मराठी सृष्टीवर श्री. जयवंत वानखडे ( रहाणार : कोपरना) यांची एक सुंदर गझल (गज़ल) वाचली. कोपरना महाराष्टात कुठे आहे, मला माहीत नाहीं.( हा हन्त हन्त !) . मात्र तें, मंबई-पुणे-नागपुर-कोल्हापुर-सोलापुर-नाशिक-औरंगाबाद-रत्नागिरी वगैरेंसारखे नाहीं, हें मात्र मला कळतें आहे. वानखडे प्रोफेशननें कवी नाहींत. ते शाळेचे मुख्याध्यापक होते. हें सर्व लिहिण्यांचें कारण की, मनाला भिडेल असें कांहींहीं लिहायला […]
ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला वाटप-रांगेत धरी जोर चांगला लांगुलचालन करून जोड सांधला संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला अखेरीस कँडिडेट-टिळा लागला धुंदीला नच पारावार राहिला प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला पक्षानें आज खरा पांग फेडला. १ ‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला ‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला खांद्यावर […]
( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत – ‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’. त्या आधारानें, हें काव्य, जरासें खट्याळ ). तुम्ही तातडीनें इकडे या, अर्जंट या. जेवत असलात तर हात धुवायच्या आधी इकडे या. अन् मत द्या. पाणी पीत असलात तर फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी इकडे या. अन् मत द्या. आंघोळ करत असलात […]
आमचं नांव खंडेराव मते. आम्ही पक्षातले ‘चुनावी-महत्व’ असलेले नेते. १ इलेक्शनचं ओझं आमच्या खांद्यावर होतं. त्यासाठी खूऽप खूऽप खपलो. विरोधकांचा खडक फोडायचा, मतांच्या खुरटल्या रोपट्याला पाच वर्षं खतपाणी घालायचं, मतं खांदायची, आपल्या पक्षाच्या बांधावर मांडायची, सांधायची, मनं जोपासायची, तण खुरपायचं, मतदारांना खिलवायचं-पिलवायचं, तन-मनानं, पण मुख्य म्हणजे धनानं मळा शिंपायचा, फळ येईल याची खात्री करायची, आपला […]
झालो मी अठरा वर्षांचा म्हणुन मिळे अधिकार नामी. मत देण्याचा. या दिवशी मी आहे राजा ताजा ताजा. उलथिन मी नेत्यांची तख्तें बदलिन मी नावांचे तक्ते. – तख़्त – सिहासन — सुभाष स. नाईक
प्रचारामधें खुशाल भांडा नंतर आकडे मांडा सत्तेसाठी कशास थांबा ? कुणांसही द्या पाठिंबा .
आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा घोष करतो, समारंभ, भाषणें वगैरे करतो, पुतळ्याला हार घालतो. आणि दुसर्या दिवसापासून पुन्हां ‘जैसे थे’ ! पण, नुसतीच व्यक्तिपूजा नको, तर त्यांच्या विचारांचें मनन, व पालन करणें हेंच खरें तर आवश्यक आहे […]
आणि, म्हणूनच, आपण सर्वांनी, तें, १८५७ चें, स्वातंत्र्ययुद्ध लढणार्या आपल्या known-unknown पूर्वजांचें आदरानें, कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवें. तें आपलें कर्तव्यच आहे. […]
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions