नवीन लेखन...

सासू सून संवाद (३)

सासू : अगं अगं सूनबाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ? सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला. सासू : अगं अगं सून बाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ? सून : चुन्याची डबी रोज जातं मागं. सासू : अगं अगं […]

विहीण

माझ्या विहीणाई बाई तुम्हा बहीण मानते जपली जी अमानत तुम्हा हाती सोपवते द्यावी मायेची सावली पुन्हा पुन्हा विनवते कधी सोसलेना तिने उन्हातान्हाचे चटके तिच्या सोनपावलांची दारी उमटली नक्षी आनंदाने भारारला गगनात तेव्हां पक्षी अशी अंगणी खेळता कधी झाली पहा मोठी अजूनही सान बाळी तिच्या बाबा दादासाठी कन्या परक्याचे धन किती सांगू या मनाला हृदयाच्या हुंदक्याला आता […]

भोंडला (सेलचा) (८)

अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी सेलची चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणायला सुधाताई मंदाताई आणायला दुकानदाराची चलाखी ८०० ची साडी ५०० ला ५०० चा ड्रेस ३०० ला चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणल्या घरी नेऊन पाहिल्या ड्रेसचा रंग झला फिका वाया गेला […]

नाच ग घुमा (२)

नाच ग घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा ऑर्केस्ट्रा नाही आला रिदम नाही मला कशी मी नाचू ह्या कोपर्‍यावरचा त्या कोपर्‍यावरचा टेलर नाही खुला नवा ड्रेस नाही मला कशी मी नाचू ह्या रोडचा त्या रोडचा पार्लर नाही खुला मेकप नाही मला कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शूमार्ट नाही खुला […]

भोंडले (४)

ब्लॉकचे पैसे भर ग मुली भर ग मुली मग जा आपल्या सासरला सासरला ब्लॉकचे पैसे भरले ग आई भरले गं आई आता तरी जाऊ का सासरला सासरला ब्लॉक ताब्यात घे ग मुली घे ग मुली मग जा आपल्या सासरला सासरला ब्लॉक ताब्यात आला ग आई आला ग आई आता तरी जाऊ का सासरला सासरला ब्लॉकची सजावट […]

मंगलाष्टक

वाद्ये मंगल वाजती सभोवती जमली सगी सोयरी विद्याभुषित ही सुसंस्कृत वधू (नाव) दिसे साजरी सालंकृत सलज्ज पीतवसना भासे जणू शारदा घेऊनी वरमाळ उत्सुक मनी कुर्यात् सदा मंगलम् ।। बुद्धीचा वर लाभला उभयता सद्भाग्य हे केवढं सन्मार्गावरूनी असेच जगती जा ह्याहूनही पुढे नांदा सौख्यभरे सदैव उधळा सद्वर्तनाची फुले ।। शुभमंगल (चाल बदलून (तदैव लग्नम्) लक्ष्मी मिळो ज्ञान […]

भोंडले (३)

आडबाई आडवणी गिझरचं पाणी काढवणी विजेने केला पोबारा माझी चुकली नऊ बारा

हळदीचे गाणे (कोळी बाजाचे)

हर्षद – प्राची जोरी बाई गो जोरी ही लग्नाची कामे करूनी थकली बाई गो दमली आयशी वराची गजाननाला आवतन केलं माय आयली डोंगराशी हिरवा शालू नेसली वरमाय चोळी घातली बुट्ट्याशी अंबार्‍यावर वेनी शोबे वेनी गो फुलांची कानात कुर्‍या बुगर्‍याबाल्या नाकात नथनी सोन्याची भांगामंदी बिंदी खाली टिकली मोठी कुंकवाची टिक् ठूशी नी बानू ल्याली नाकात नथनी मोत्याची […]

भोंडला (बसचा) (७)

अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी बसची बस आली बस आली पकडा पकडा पुढच्याला मागे ढकला ढकला असेच होतात अपघात टाळणे तुमच्या हातात थांब्यावरती थांबा थांबा शिस्तीत लावा रांगा रांगा उतारूंना उतरू द्या पुढच्याला पुढे होऊ द्या प्रवास तुमचा होईल छान समूहाचे ठेवा भान अंगी बाणा शिस्त शिस्त शिस्तीवरती ठेवा भिस्त

आधुनिक मंगळागौर (१) – गोफ

गोफ विणू बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू गोफ नको बाई गोफ नको त्यापेक्षा टिव्ही पाहू गरे घ्या गरे पोटाला बरे नाही खाई त्याची म्हातारी जगे जगली तर जगली आहे तशी चांगली वृद्धाश्रमात राहते बापडी.

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..