MENU
नवीन लेखन...

भोंडले (2)

अक्कण ओटा चिक्कण ओटा अस्सा ओटा सुरेख बाई ग्रॅनाइटचा असावा अशा ओट्यावरती बाई मिक्सर लावावा अस्सा मिक्सर सुरेख बाई सुमीतच्या मिक्सरमध्ये इडली रवा फेटावा अस्से सुरेख पीठ बाई फ्रिजमध्ये ठेवावे अस्सं पीठ थोडं थोडं इडलीपात्री उकडावं. अश्शा इडल्या सुरेख बाई चटणीसवे वाढाव्या अस्सा बेत सुरेख बाई कष्टांना वाचवतो अश्शा पोळ्या द्वाड बाई टाळाव्या शक्यतो.

घाणा (मुलीच्या लग्नाचा) (३)

आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला (नाव) ताईच्या लग्नाचा ।।धृ।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला आधी वंदू कुलदेवीला गजाननाला नमुनी स्मरू आप्त पूर्वजांना …….. ।।१।। आल्या काक्या, आल्या आत्या, मावशी, मामी, ताई आल्या आम्ही घाणा जो भरीला आम्ही घाणा जो भरीला…….।।२।। आम्ही घाणा हा भरीला आम्ही घाणा हा भरीला पहिली हळद […]

भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

अरडी ग बाई, परडी, रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची, ही गर्दी फेरिवाल्यांची फेरीवाल्या फेरीवाल्या माल दे, माल दे हा मोल घे मोल ठेवला हातावर, गाडी होती नाक्यावर आता ह्याला शोधू कशी, बाईसाहेब पडतात अशा फशी

पोरकी

आई ग …… तू असतीस तर दारी मोगरा फुलला असता स्वागतकक्षी फुलदाणीमध्ये गेंद टपोरा झुलला असता । हृदयाच्या पायघड्यांवरूनी नेले असते देवघराशी हळदीच्या पाऊलखुणांची उठली असती घरभर नक्षी । मायेच्या नजरेने मजला पुसलें असते गूज कालचे लाज लाजरी नजर हासरी उत्तर देते तुजला त्याचे । ताटा भोवती असती महिरप पाटा खाली असते स्वस्तिक वेढी विरोद्या लग्नचुड्याचे […]

भोंडले (१)

ऐलोमा पैलोमा वरळीच्या देवा माझा प्रोग्रॅम होऊ देईन तुला मेवा माझ्या प्रोग्रॅम लागला मराठी चॅनलवर तिकडून आला नातू त्याने बदलला सत्वर एक चॅनल बदलू बाई दोन चॅनल बदलू दोन चॅनल बदलू बाई झी चॅनल बदलू झी चॅनल बदलू बाई सोनी चॅनल बदलू सार्‍या चॅनलची चाचणी पहाल तेथे नाचगाणी करिष्मा समता मनाली बौंद्रे भोवती नाचती हूप हूप […]

घाणा (आधुनिक)

दीपक दादाची फियाट हिरवी करवली मिरवी सुनीता ताई मांडवाच्या दारी कसली खट्पट् नेहमीची कटकट गाडीची ती मांडवाच्या दारी अडली मोटार उठ धक्कामार प्रदीप बाळा मांडवाच्या दारी कसली फट्फट् गाडी झाली स्टार्ट दिपकाची

भोंडले (५)

सासरच्या वाटे गुलाब भेटे कोण पाव्हणं आलंय ग बाई सासरे पाव्हणं आलेत ग बाई सासर्‍यांनी काय आणलंय ग बाई सासर्‍यांनी आणली मिठाई मिठाई मी खात नाही सांगा मी येत नाही दाराचं लॅच लावा ग बाई गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।। सासरच्या वाटे गुलाब भेटे कोण पाव्हणं आलंय ग बाई सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई सासुबाईंनी […]

वरात

आली दारात वरात गुलमोहर फुलला, लक्षुमीच्या स्वागताला सडा फुलांचा घातला । आली दारात वरात दारी तोरण हिंदोळे पैंजणांच्या चाहुलीने मोर मण्यांचे जाहले । आली दारात वरात लिंबलोण आणा कुणी दृष्ट लागू नये तिला सून माझी बहुगुणी । आली दारात वरात दार आडवी बहीण म्हणे – अडविते आज उद्या पाठीशी घालीन । आली दारात वरात पूस डोळे […]

शारदास्तुती

देवी शारदे शारदे मांडीयेला गजर तुझ्या कृपेने उजळू दे परिसर ।।धृ।। तुझ्या हातात हातात विद्वत्तेची बीन तुला बसाया बसाया मोराचे आसन रूप आगळे आगळे शोभे श्वेतांबर ।। तुझा प्रसाद प्रसाद लाभो भाविकाला विनम्र होऊ दे होऊ दे अष्ट सिद्धीकला सार्‍या भक्तांचा भक्तांचा होऊ दे उद्धार

घाणे

आधी मूळ धाडा अष्ट गणेशांना इच्छिल्या कार्याला शुभारंभ । आधी मूळ धाडा बापुजी देवाला घरच्या कार्याला हातभार । आधी मूळ धाडा कार्ला गडावरी बैसोनी अंबारी येई माते । आधी मूळ धाडा सप्तश्रुंगावरी भगवतीची स्वारी येई कार्या । आधी मूळ धाडा कृष्णेला वाईच्या मान आजोळीचा आहे तिचा । आधी मूळ धाडा जेजूरी खंडेराया बहिणीच्या कार्या पाठी उभा […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..