गणेश वंदन
गजानना तू स्फूर्तीदाता तू सकलांचा विघ्नहर्ता ।।धृ।। वक्रतुंड लंबोदर मूर्ती परशु विराजे एका हाती दुजा वर देता ।।१।। पितांबर शिरी मुकुट शोभतो जास्वंदी दुर्वांनी सजतो मोदक आवडता ।।२।। विनम्रभावे तुझिया चरणी अर्पियली मी माझी झरणी उमटू दे कविता ।।३।।