वाट
दाटे विचारांत ओसंडून सैरभैर व्याकुळलेली वाट वाटेवरी भग्न स्वप्ने उरी घेउनी जन्मली ही पहाट पहाटे अखेरीस सर कालचा दिस, रेंगाळला सुन्न घाट घाटावरी पाय ओढीत ही घट्ट धरली पुन्हा वहिवाट धागे कसे जोडले हे असे सांधताना रुतोनी बसावे तिथे तिथे वाटते सर्व संपून जावे फिरोनी पुन्हा नेमके आठवे आठवांची ठेव गळकी जणु मनी मेघांचे काजळ […]